ग्रामपंचायत कान्हेवाडी तर्फे चाकण
सर्व साधारण माहिती
सातत्याने येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी लोकांनी लोकसहभागातून विकास करायचा असे ठरवले. गावातील लोकांच्या लोकसहभागातून सर्वांच्या श्रमदानाने कान्हेवाडी ते कॅडबरी कंपनी असा ३ किमी लांबीचा रस्ता तयार केला गेला. पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक विहीर, शाळेसाठी दोन वर्गखोल्या लोकसहभागातून व श्रमदानातून बांधल्या. १९९० पासून गावाने सर्वांच्या सक्रिय सहकार्यातून महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव योजनेत सहभाग घेतला व गावच्या विकासाची घोडदौड वेगाने सुरु झाली,
" गावच्या विकासासाठी सरसावले साऱ्यांचेच हात आदर्शवत गावाने टाकली विकासाची कात "
देशपातळी वरील पुरस्कार
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार - (२०१६-१७)
आपल्या गावाने स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे.
गावात धनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता विषयक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि सांडपाणी व्यवस्थापनाची उत्कृष्ट व्यवस्था करून आपण स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. या उपक्रमांमुळे गावात स्वच्छता, आरोग्य आणि सुंदरता वाढली आहे.
या आदर्श कार्याची दखल घेत आपल्या गावाला तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार आपल्या गावाच्या शिरपेचात एक नेत्रदीपक कामगिरीची नोंद आहे.
मित्रांनो, हा पुरस्कार केवळ एक सन्मान नाही, तर आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतो. पुढेही आपण स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त उपक्रम आणि पर्यावरणपूरक विकास यावर भर देऊया. स्वच्छता ही केवळ मोहिम नसून ती आपल्या जीवनशैलीचा भाग बनवूया.































